पान:इंदिरा.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० नृपतिची अशी पाहुनी स्थिती, शरम पावली इंदिरा सती, वदलि:- "रक्षिलें मजिवा जयें, • अनुजस्ति का मृत्यु त्यास ये !” ३३ साक्या. इतुकें बदली, याउपरी तो नृप निजसुतकंठींची नृपतनयेची प्रतिमा काढी रक्षिलि बहु दिवसांची, दावी नृपतनये, । तैं स्मृति तिज मातेची ये. ३४ स्मरण जाहले बाळपणाचें, आला हृदयिं उमाळा; पाहुनि नृपसुत-पांडुर-वदना गहिवरली नृप - बाळा; वाटे तिजलागीं। "दिसते निजकृति विकलांगी." ३५ श्लोक. पश्चात्ताप तिच्या हृदीं उपजला, "हे काय आरंभिलें ! केलें काय, मनीं किती अवतिलें, अंतीं कसें जाहलें. ? उद्गारां अशि काढुनी नृपसुताच्या ये बसे ती कुशीं, बीजेची विधुकोर चक्षु हरिते, चक्षू हरी ती तशी. ३६ ठेवी अंगुलि राजपुत्रभ्रुकुटीं, न्याहाळि तन्नासिका; बोले-"प्राण असे अहो तनुमधीं, राया, भिऊं हो नका ! भावांसंगतिं चंद्रकेतुस नृपा ! हो ! नेवुं द्या मंदिरा ! भाऊ मानुनि पूर्ण या अवसरी सेवील त्या इंदिरा !" ३७ आहे प्राण सुताचिये तनुमधीं हैं ऐकुनी राजिया, आला जीव जिवीं, पुन्हा सकळ तच्चिंताहि गेली लया; झालीं स्तब्ध, तटस्थ तीं उभयतां रोंखूनि न्याहाळिती; दोघें शोभति, जेविं वासर-निशा सम्मेलनीं शोभती. ३८