पान:इंदिरा.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५९ जिंकियलें वीराला भगिनीच्या शत्रुला रणीं युद्धीं; झाला विगलित बहु तो, निजदेहाची नसे तया शुद्धी. २५ तुंबळ युद्ध महा हें झालें दारुण, बहू असें विरळा; हरला सत्यध्वजसुत, परि दावियलें तयें स्वबाहुबळा. २६ शशिवदनें कमला निजसामोज्यां स्वबाहुदंडांचें दावियलें सामर्थ्य, प्राबल्यहि तें तसेंचि स्नायूंचें. २७ जरि पडले थकुनी ते, चिरले, चुरले, मनींहि चुरचुरले, परि सामोज्यां जर्जर केलें कीं देहभान त्यां नुरलें. २८ दिंडी. तिघां ऐशां बंधूंस पाहुनी ती, हस्त कुरवाळी तयांचे स्वहस्तीं; वदलिः–“यांतें या मंदिरांत नेवूं; धुवूं, चोळूं, घायांस तेल लावूं ! २९ श्लोक. हे भ्राते अति दिव्य वीर सकळां मुक्तिप्रदाते स्त्रियां, द्यावे येथ पडूं कसे ? निजपुरीं त्यांतें चला नेवुं या ! ऐसें बोलुनि जाय ती तिथ, जिथे तो चंद्रकेतू पडे; बुद्ध्या ती तिथ जाय कीं, कळत ना हें दैवयोगें घडे. ३० सत्यध्वज प्रेक्षुनि इंदिरेला पुत्राचिये सन्निध मौन ठेला; मुद्रा तयाची दिसली उदास, कीं केसरी प्रेक्षि मृतार्भकास. ३१ पाहोनी गलितां विदारित भुजां तैं चंद्रकेतूचिया, रक्तें माखियल्या मुखा, सुहृदयीं आली सतीच्या दया; सुस्कारा तयि टाकुनी सकरुणा रायाप्रती न्याहळी; प्रेक्षूनी नृपतीस त्या गहिंवरें, ती होइ काळीनिळी. ३२