पान:इंदिरा.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाऊं द्यावें त्वरित मजला दिव्य ताता दयाळा !
शोधोनी तत्सदनं तिजला पाहतों लोकपाळा !
पाहोनीयां रुचलि, तर ती आणितों राजबाळा,

जिंकोनी मी वरिन तिजला साधुनी योग्य वेळा. २२<br.
युद्ध जें जें जित मिळतसे, आपणा क्षत्रियांनां 

भोगाया तें प्रियतर असे, पूर्ण हें जाणतांनां ?

द्या हो आतां त्वरित मजला तात तुझी रुकारा,
जातों घ्याया करवुनि सवें आपुल्या अंगिकारा. २३
मी क्षत्रियांच्या कुळिं पुत्र साचा
योजून युक्ती, मम मानसाचा

हेतू प्रयत्नें पुरवीन ताता,
होईल आज्ञा जरि शीघ्र आतां ".२४

उभा होता पाठीं शशिवदन, तो राजतनया

ह्मणे - "संगें नेई मज परम मित्रा ! करिं दया;?
तुझ्या वीणें वाटे युगसम संख्या एक चिपडी,<
ममायुष्या का मी करूं, वद कशी जाइल घडी". २५
तैं मित्र दूजा कमलाक्ष बोले-<

"माझी स्वसा सन्निध राजबाले
आहे; मला ने, तिथ भेट घेऊं;

सा तिच्या हें तडि काम नेऊं ". २६


पद. राग धनाश्री . ताल एका.
( क्षणभंगुर संसार – या चालीवर .
)

"मजला ने आपुल्या संगें । मित्रा ने आपुल्या संगें ॥ ध्रु० ॥