पान:इंदिरा.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झालीसे अवघी चिरायु अपुली आतां कृती ही खरी; युद्धीं गौरविलें तिला, उपरि या ती कोण हो संहरी ! या आतां उचला, सुबंधु मम हे घायाळ जे जाहले; नेवूं मंदिरिं, या, तिथे निजवुं त्यां, जे संगरीं भागले. १७ ज्यांहीं रक्षण आपुल्या नगरिचें केलें तयां गौरवूं, दावूं पूर्ण कृतज्ञता निजकरीं, त्यां लौकिका पोंचवूं; न्हावूं या, धुवुं, चोळं, खाववुं, तयां, रूयर्थीचि जे शीणले; स्त्रीकैवारपवत्रित त्रिजगतीं जातील हे गाइले." १८ साकी. बोलुनि ऐसें सती इंदिरा मंदिर सोडुनि आली, घेउनि निजकरिं मंजुळि बाळा चाले ती गजचाली; पाठीं येति स्त्रिया । पडल्यां अनेक उचलाया. १९ कोणी उघड्या, कोणी शाली पांघरलेल्या आल्या, अनवाणी कुणि, जोडे लेवुनि अस्ताव्यस्त निघाल्या; “वीरां उचलाया"। आपसां ह्मणती "हो! या! या." २० चालति नारी कुरणांतुनि, तैं नाजुक तत्पद रम्य कुरण चारिवरि दिसती सुंदर, कृति ईशाचि अगम्य, वीरां उचलाया । निघती धांवत त्या बाया. २१ आर्या. | हरिणींच्या कळपामधिं, यूथपति हरिण जसा उभा राहे, | शिरिंची सुशृंग-शोभा गगना दावित, दिगंतरा पाहे; २२ तैशी ही मृगनयना मृगसमुदायांत इंदिरा दिव्या (शोभे प्रमुख विशाळा, येतां साह्या स्वबंधुच्या सेव्या.२३ कटिवरि मंजुळिवाळा घेवुनि बंधूसमीप उभि राहे; प्रेक्षी बंधुमुखाला, धर्माचा लोट ज्या शिरीं वाहे. २४ युग्म.