पान:इंदिरा.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५७ रिपु तन्नाशा अवतरला, घाली निष्ठुर वरि घाला, ॥ अंतीं देहिं निमाला; || रिपूचा नाश भला झाला. ॥ १ ॥ मुक्ति-वृक्ष हा स्त्रिया उभारिती, जाती जमवीती, ॥ इतुक्यामाजी नर येती, वृक्षा छेदुं पहाती, परि रिपु देहिं निमाला, ॥ रिपूचा नाश० ॥ २ ॥ श्लोक. ११ 'स्त्रीरूपी हा तरु उपटुनी पाहिजे तेथ नेवूं, भेदोनी त्या' पुरुष बदले 'आपुल्या कामिं लावू, जाळूं त्याचे करुनि तुकडे सर्पणालागि कांहीं, नौका होड्या सुरुचिर घरें बांधवूं कैक त्यांहीं.' १२ परी यत्न गेले फुका ते तयांचे, मुळीं कांहिं आलें न हातीं नरांचे; करायास येतांचि स्त्रीवृक्षघात, नरें मोडुनी घेतलासे स्वहस्त. १३ असे मोडलें शस्त्रही हातिं त्यांच्या, वसे अंगि शक्ती अशी त्या स्त्रियांच्या; अहो वृक्ष वाढेल हा थोर आतां; चढूं योग्यते उन्नतीकाळ येतां. १४ सुरंगें सुशोभा जशी ये वसंतीं, स्थिती स्त्रीजगीं तेविं होईल अंतीं; दया देविची थोर, शत्रू निमाले, हरायास आले स्वयें हारिं गेले. १५ जे युद्धीं श्रमले स्त्रियां सुखविण्या भ्राते महा-शूर ते, ज्यांहीं संगरिं या मृता नगरिला केलें पुन्हा हो जितें, या गुंफूं फुलहार रम्य सतिनो घालूं तयांच्या गळीं; या होऊं पुजुनी तयां मनभरें, वीरांधिंच्या हो धुळी. १६ १४