पान:इंदिरा.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ दिंडी, कशे रीती ये कमलजा इथे ती ? स्मरा तरि ती जिथ पडलि रडत होती; जयीं नृपसुत तेथोनि संगराला शशी-कमलाक्षासह निघोनि गेला; ६ युग्म तयीं आक्रोशें कमलजा पुन्हा ती पडे धरणीवरि, अञ्जलोट येती; पुन्हा मूर्च्छा ये, करीत आक्रोश; माय-ममतेचे कठिण महा-पाश ! ७ कांहिं वेळानें उठे, सभोतिं पाहे, संगराचा तो कानिं नाद वाहे; संगरांगणिं ये, तोंचि पाहियेलें चंद्रकेतूला धरणिं पाडिलेलें. ८ लोक. मंदिरामधुनियां सकळा परी इंदिरा बघुनि हर्षलि अंतरीं; लग्नवाद अजि ना मुळि राहिले, पारिपत्य कुंवराप्रति जाहलें. ९ दिंडी. कडे घेउनियां, कमलजा-सुतेला स्थानिं राहे उभि उच्च चारुशीला; काढियेला ध्वनि जो किं गगनपंथीं भेदि अंबर, वसुमति, कर्णग्रंथी. १० पद. (“गडे हो कृष्ण गडी”—या चालीवर). रिपूचा नाश भला झाला, | स्वयें तो देहिं निमाला. ॥ध्रु॥ पेरियलें स्त्री–मुक्ति–बिजाला, अंकुर त्या आला; ॥