पान:इंदिरा.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सख्य नामक सर्ग साहवा. श्लोक. न्ह्याळोनि सत्यध्वज पुत्रकाया मूर्च्छावलेली रणभूमिठायां, वांकोनि चांपी, परि भान नाहीं; चांपीत जैसा नयनान्ध राही ! १ पिर्तयाचिये ना मुळिं जीव जीवीं सुत नासिकाग्रीं निजहस्त ठेवी; कमळापरी जो सविकास होता, पडला असे तो गलितांग आतां ! २ ह्मणेः-पुत्रा ऐशी कधिं कुणि अरे काय करिती वधूची संप्राप्ती ? सुगम न गमे ही मज रिती; वधूच्या प्राप्तीला प्रखर तुज संग्राम घडला; सुवर्णाच्या अद्री- सम तव तयें देह पडला ! ३ पडावें या तूझ्या विकळ तनुपाशीं मनिं असे; स्वहत्या जाणें मी दुरित, वद तें आचरुं कसें ? न भीं मी मृत्यूतें, परि बहु असें भीत दुरिता; बहू गेलें आयू, करिं मज अतां देव धरिता. ४ कमलजा मग ये सरसावुनी नृपतिच्या बहु कंपित मागुनी, स्वतनुजा निज मंजुळि अर्भक परत मेळवुं ये तिथ याचक. ५ १ इंदिरावृत्त श्लोक ७ वा.