पान:इंदिरा.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ पुत्र रणामधिं पडला, वैभव आतां सारें गेलें, चंद्रकेतु कुळदीपक गेला, कृष्ण वदन मम झालें ! आतां कैंचि स्रुषा ? । प्रभु हे झाली काय दशा ! १५५ काय करूं अजि राज्यपदाला, धिग् धिग् मम जिविताला, बाळा ! पुत्रा ! कशालागि हा संगर दुर्धर केला ! आतां कोण वरी । बहु इच्छित ही तव नवरी ?” १५६ श्लोक. - राजा न्ह्याळी भूवरी पुत्र - आंग, बोले:—“मूर्च्छा ही, किं हा मृत्युसंग !” राहीलेंना भान राया जगाचें; गेलें वाटे श्रेय साऱ्या श्रमांचें. १५७ पांचवा सर्ग समाप्त.