पान:इंदिरा.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५३ वीरभद्रे तथं वळुनि, कुशळ पेंचें अंग काढियलें झडकरी स्वताचें. १४८ चंद्रकेतू मनिं आपणासि बोले जयीं लढतां तत्स्नायु ढील झाले:- " गजेंद्राचा त्या वामनी तनूचा पुत्र आहे हा काय वीर साचा ? १४९ तरी वाटे मनुजांत मातृ-अंश अधिक असतो, जयिं वाढतो सुवंश; नसे पितयाच्या वामनी तनूची, परी मातृवळा साक्ष असे हाची !” १५० - साक्या. उजव्या डाव्या पिळपेंचांतें मारुनि उभय नरांनीं, परस्परांतें जर्जर केलें, लढतां आली ग्लानी; झाले विव्हळ ते, । स्वमनीं ह्मणती का घडतें. १५१ इतुक्यामाजी चंद्रकेतुला वीरभद्र पिळ मारी; फेंकुनि देई धरातळवटीं, बाहू-अस्थि विदारी; पडला वीर रणीं । घातें थरथरली धरणी. १५२ हर्ष जाहला स्त्रीमंडळिं तैं, गर्जे जयजयकार, धरणीवरती नृपसुत पडला मेळविलें यश थोर; ह्मणती- “जिंकियलें, । पुरुषां शासन अजि झालें." १५३ सत्यध्वज निजपुत्र पाहुनी धरणीवर पडलेला, कंपित होवुनि समरांगणिं तो धांवुनियां गेला; वदनीं “हाय” ह्मणे ! । “आतां जगतीं काय जिणें ! १५४