पान:इंदिरा.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ समरीं स्त्रियांचे वैरी सर्व पडावे बाहू स्फुरति तैं इंदिरेचेही; ॥ १ ॥ ठाकले० मनिं वाटलें जावोनी रंगभूमीतें, जिंकोनि यावें, हर्षवावी मही; ||२|| ठाकले० १४३ श्लोक. भिडे चंद्रकेतूस जैं वीरभद्र, मुखीं त्यांचिया तैं चढे रंग रुद्र; भुजीं दंडिं जंघीं पदीं एकमेकां धराया करीती सुयुक्त्या अनेकां. १४४ परी वीर मोठे ! न कोणी कुणाला मुळीं आटपे वा, न पावे श्रमाला; पिळाचे वरी पीळ मारोनि, वीर बळा स्नायुंच्या दाविती ते अघोर. १४५ साकी. कमलाक्षाला भुई पाडिलें आधीं तत्स्पर्ध्यानें; शशिवदनाची तीच दशाही झाली तिथ युद्धानें; आतां एकचि तो । नृपसुत समरांगणिं लढतो. १४६ श्लोक. पाहे युद्ध समीप ती उभि महा-शौर्य-प्रभा इंदिरा; वाटे राजसुता मनांत "कुमरी ही लाजवीते नरां; प्रेक्षी शांतपणें कशी सकळिकां, आहे किती धीट ही ! दावूं या हिजला, रणीं कशि नरां ये पालथीतां मही.” १४७ दिंडी. असें बोलुनि, धरि वीरभद्र-दंड, पीळ मारी मग त्यासि तो प्रचंड;