पान:इंदिरा.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५१ विचारांत, कृत्यांत, तैसा स्वभावीं अरे फेर होतो, असें विश्व दावी." १३५ अशा भाषणालागिं सत्यध्वजाच्या तदा ऐकुनी चंद्रकेतू सुखाच्या, मनीं आपणाशीं म्हणे शौर्यमूर्ती 'नको प्राण घेऊं' असें का ह्मणे ती! १३६ स्मरण मग तयातें जाहलें त्या ध्वनीचें "जय तुज मिळतो रे, पंथिं ये दक्षिणेचे; " ध्वनिवरि निजचित्तीं ठेवुनी पूर्ण श्रद्धा, नृपतिदुहितृकामीं चालला मल्लयुद्धा. १३७ आर्या. दोघां मित्रांसंगें युद्धातें चंद्रकेतु तैं आला, झाला सिद्ध लढाया, माराया कीं स्वयें मरायाला. १३८ स्त्रीवेषा घेउनियां गेले शुद्धीस राजकन्येच्या, म्हणुनी क्षात्रकुलोचित गेलें बळ काय बाहुंचें त्यांच्या ? युद्धाची सामग्री वीरांच्या स्नायुंमाजि ती वसते; न नवल कीं त्या त्रिकुटें ठोकियले दीर्घदंड अपुले ते. १४० बंदुक तरवार तिखट भाला बरची धनुष्य बाणहि ते या संगरिं तैं त्यजिले, साधाया भुजबळें स्वकार्यातें. १४१ ठेले तीन जसे इथ, तेथें तैसेच तीनही ठेले; संगर आरंभियला, सैन्य उभय पक्षि पाहतें झालें. १४२ पद. राग परज ताल त्रिवट. (“वारिवे मोहाणा बेडा पार" - या चालीवर.) ठाकले युद्धाला शूर वीर । ते रणधीर ॥ प्रबळ वज्रदेही. ॥ ध्रु० ॥