पान:इंदिरा.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० नरां-हातीं अधिकार तो असावा, धर्म आज्ञेचा तिनें आचरावा; व्यर्थ घोंटाळा नाहिं तरी होई, जगीं प्रत्यय व्यवहारिं नित्य येई. १३० श्लोक. नसावी रे जाया सतत पतिला त्रासवि अशी, कधीं शब्दें ताडी निजपतिस, पाडी कधिं फशीं; न जी आनंदाचा मुळिं उगवुं दे अंकुर गृहीं, गृहा ऐशी भार्या करुनि बुडवावें न कुणिंही. १३१ दिंडी. नसे भ्रांती मज ऐशियेप्रकारीं इंदिरेच्यासंबंधिं दुःखकारी; जिंकिं तिजला, ती कधिं तरी वळेल, अंतिं दीर्घ तुझा यत्न हा फळेल. १३२ श्लोक. गजा-अश्वालागीं निजकरि जसा स्वार धरुनी, स्वसामर्थ्यं घेई सकळ पशुंची शक्ति हरुनी, तसा जिंकीं पुत्रा नृपकुमरिला युक्ति करुनी; मुलें होतां जाई सकळ मद तीचा उतरुनी. १३३ अरे लग्न होतां कधीं पालटे तो स्त्रियांचा स्वभाव, स्वयें शुद्ध होतो; जयीं बाळकें पोटिं येती, तयांतें जगीं ज्ञान हें काय हो ज्ञात होतें. १३४ नसे काम सोपें मुलें वाढवीणें ; पुरे रे पुरे होइ तें माय-जीणें;