पान:इंदिरा.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४९ अहो वीरांची ही गमत जननी जन्मलि असे; नृपां-शूरांचीया कुशळ अवनीं पूर्णहि दिसे; जगा वाटे स्वैर प्रखर वडवानी किं अबला, परी ज्ञाती मोठी, परम विदुषी चित्तिं विमला. १२४ स्वेच्छेनें कशि पाहि ती स्वपितरा राया गजेंद्राप्रति चातुर्ये निजबुद्धिच्याहि सुबळें, स्वाज्ञेमधीं राखिती ? पुत्रा ! आजवरी कसें, बघ तुला नादीं तिणें लाविलें ! आहे दुर्लभ जाणशी, परि मुला! सर्वस्वि वेडाविलें. १२५ जेव्हां स्त्री वळखी असे पुरुष कीं अंगीं मनीं दुर्बळ, वर्चस्वा मिळवावया न कधिंही ती एक सांडी पळ; जिंकोनी पुरुषाप्रती मिरविते सक्ती तयाचे वरी, कांहीं होउ विचार, कार्य अपुलें, वाणी करी ती खरी. १२६ दिंडी. सत्य आहे परि नियम सृष्टिचा हा- शोभवावें त्या स्त्रियेनें स्वगेहा; सौख्य नांदे तिथ पत्निच्याच पायीं, विराजे तो नर शूर रणाठायीं. १२७ हातिं त्याणें तरवार गाजवावी, शिवणकामा सुइ करिं तिणें धरावी; ज्ञान दावावें, मसलतींत यानें; हृदयिं कोमलता वाहवी स्त्रियेनें. १२८ गृहा सांभाळुनि, करुनि पक्क अन्न, पती सेवावा करुनि त्या प्रसन्न; बाळ खांदे कटिं वाहुनी सतीनें, तथा रक्षावें योग्यशा रितीनें. १२९