पान:इंदिरा.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५

“कशी रायें केली”–स्फुरत नृप सत्यध्वज वदे,

“अमर्यादा माझी कुमरि-खुळ-नादें बहुमदें !
करोनी संग्रामा धरुन नवरी आणिन घरीं,

सुताच्या हातीं मी करिन वधुला, क्षत्रिय तरी." १७ <br.

दिंडी.
राजपुत्रे ऐकिला वधुनिरोप;<br.

दुःख झाले बहु, चढे मनीं कोप,<br. ह्मणे स्वमनीं “जिंकीन नोवरी ती,
मला वरणें नाहींच अन्यरीती.” १८

श्लोक.

पाहोनी निजतात - मानस-गती ज्ञात्या कुमारें अशी,

केली युक्ति विचार पूर्ण मथुनी ऐका सुपुत्रे कशी; 

रायासन्मुख येउनी सुविनयें ठेला उभा लीनसा,

बोले "तात ! कशा विचारिं बुजतां ? कां खिन्न हो होतसां ? १९ 

जरी आज्ञा होई, गमन करितों दक्षिणपथा;
न जाणों सौंदर्यादिक असति वृत्तांतचि वृथा;

वरावी म्यां कैशी मुळिंच दिठल्यावीण तरुणी ?
मला ऐशी मिथ्या रुचत मुळिं ना लग्नसरणी. २०
बघोनी ती मातें जरि न रुचली राजतनया,
करावें म्यां काई ? तरिंच वधु नेमस्त बघुं या;

जया जैशी व्हावी, मन मिळतशी शोधुन तयें ?
हो भार्या, तरिच जुगती दोन हृदयें. २१<br.