पान:इंदिरा.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ तूं मारशील, तरि ते मरतील सारे; हें कृत्य तूं करिं, परी बहु रे विचारें; मारूं नको, परि तयां करिं योग्य दंड; हत्येविणें करित शासन ये उदंड. ११८ सान्या स्त्रियांचें बळ कोटि-खंडी येवो तुझ्या रक्षक बाहु-दंडीं ! होईं यशस्वी झणि जावुनी रे ! गाईल तूझी जग कीति सारें. ११९ जन्मोजन्मीं युवतिमुर्खि रे नाम गाजेल तूझें; कार्य स्खींचें बुडत, समुळीं एकटीचें न माझें; रक्षीं त्यातें निजभुजबळें बंधुराया नरेंद्रा ! डंका वाजे जगिं तव, असे जो गती सूर्यचंद्रा. १२० बहुत ठेवि चौफेर चौकशी, पडशि ना तरी बंधु तूं फशीं; असति शत्रुचे मागते बरें छपुनि, ऐकतें, छावणींत रे. १२१ गेली एक असे इथूनि अमुची स्त्री शत्रूच्या बाजुला, टाकोनी निजकन्यका कळतना कोणाकडे कोमला; रक्षं अर्भक तें, गुणीहि उपजो, मातेसि तें लाजवो; स्वातंत्र्योन्नति-पंथ हा निवडिला, अंतासि या पाववो.” ऐशियापरि सती लिहि इंदिरा; चंद्रकेतुस वदे नृप सद्गिराः- "फार खोल कटु बोल असे हिचे ! केविं उक्ति अशि ही पुरुषां रुचे ? १२३