पान:इंदिरा.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४७ दुःखी कामिनिंची स्थिती बघुनियां आली मला दया ! केला म्यां पहिलाच यत्न अवध्या नारी सुधारावया; आप्तांतें, स्वजनां, कुळा, सकळिकां सोडोनि आरंभिलें कृत्या या, परि साहलें न पुरुषां, तैंत्यासि विध्वंसिलें! ११३ पैद. राग धनाश्री. ताल एका. ( " क्षणभंगुर संसार" या चालीवर ). भ्रात्या ! राखि स्त्रियांची लाज | राखि स्त्रि० ॥ ध्रु० ॥ वैभव स्त्रीचें जाय किं राही, येइल कळुनी आज; ॥ १॥ भ्रा० प्राणाहुति ही देऊं आह्मीं, रक्षाया स्त्रीकाज; ॥ २ ॥ भ्रा० हाणूंनी शत्रू, स्त्री-स्वातंत्र्या रक्षक तूंच विराज; ॥ ३ ॥ भ्रात्या० ॥ ११४ ॥ श्लोक. मातेचा रुधिरांश तो तुजमधीं; पिंडांशही तो तिचा ! रक्षाया मजला, तुला जननिनें देहो दिला बंधुचा; माझ्या तूं मनिंचा खरा उमजशी हेतू मुळापासुनी, रक्षीं रे मजला, प्रिया भगिनि हे गेली असे त्रासुनी ! करीं शिक्षा, बंधो, रणिं नृपसुतातें; विजयि हो ! नको तत्प्राणातें हरण करूं, तूं जाण परि हो ! तया दावीं कीं रे, समरिं लढुनी योग्यहि रिती, स्त्रियांतें रक्षाया नर कितिक या लोकिं असती. १९६ जयानें मत्प्राणा, जळ-तळिं झणी मारुनि बुडी, असे रक्षीयेलें, मम निजभुजीं वाहिलि कुडी, तयाचा मी कैसी हरण करवूं प्राण अबला ? परी त्याला शिक्षा दिसत करणें भाग मजला. १९७ १ हें पद बेहागांत आणि भैरवींतही गातां येतें; ताल त्रिवट,