पान:इंदिरा.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ असा झाला संकेत आपसांत; इंदिरेचा अनुमोदि हें न तात; ह्मणे मारोनी हात तो कपाळा:- "बाळबुद्धी ही शोभतेचि बाळां.” ९९ करिति उत्तर ना तदा कोणि राया; पित्याच्या तैं छावणिसि उठे जा चंद्रकेतू तो सुमित्र सांगातें, मल्लयुद्धाचें कथाया पित्यातें. १०० पित्यासन्निध ठाकला दिव्यमूर्ति, मल्लयुद्धाची कथिलि मानसार्ती; वदे सत्यध्वजः- “ऐक बा सुपुत्रा ! गोष्टि घडल्या रे येथही विचित्रा. १०१ हेर पाठविले तीन लगोपाठ परत आले, इंदिरा न घे गांठ; अशा स्त्रीचा उन्माद योग्य रीती मोडियेला पाहिजे आझिं हातीं. १०२ श्लोक. गेला एक अर्धी महा चतुरसा बा स्वार त्या स्त्रीपुरा, द्वारासन्मुख ठाकला, परि न त्या देई कुणी उत्तरा; हांका मारुनि दीर्घ कोरड बहू आली तयाच्या मुखीं; भेरी वाजवुनी बराचि थकला, कोणी परी नोळखी. १०३ गेला जैं दुसरा, तयासि धमकी देती स्त्रिया धीट त्या; मुष्टी-मोदक आर्पिले तिसरिया, त्याची मला ये दया; पाहे सर्व असा प्रकार अपुल्या नेत्रांपुढें इंदिरा; वार्त्ता ऐकुनि घ्यावया परि तयां जाऊं न दे मंदिरा". १०४