पान:इंदिरा.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुत्रानें कथिला तदा स्वपितया तैं योजिला मार्ग जो; ऐकोनी सुतवाक्य, तात खवळे, बोले:-“कुडी ही झिजो ! पुत्रा, प्राप्ति तुला असे न वधुची झाली अरे जोंवरी, जिंकोनी तुजलागिं ना दिलि, न तो दावीं मुखा भूवरी." ह्मणाले रायाचे पुरुष दरबारी:- "नृपवरा ! धरा कां हा हेका फुकट तुझि जाण्यासि समरा ? बसा स्वस्थानीं हो, निघुनि रणि सर्दार सगळे, स्वदेहांतें अर्पू ! कुमार कशि ती पाहुं न वळे." १०५ साकी. इतुक्यामाजी नृपतनयेचें पत्रक निजबंधूला उत्तर आलें, युद्धाचा कीं निश्चय अंती झाला; परिसा, त्या पत्रीं । केवीं लिहि ती नृपपुत्री:- १०६ श्लोक. "भ्रात्या ! पाहाश तूं, कशी जगतिं या आहे स्त्रियांची स्थिती; हाणी, आपटि तो पती, कुटि करें, जाळी, जरी स्त्री जिती ! खोडा बेडि पदीं करीं चढवितो, आंधारिंही कोंडितो ! योजोनी कटु दुष्ट रुष्ट वचनें स्त्रीकाळिजा फाडितो. १०७ पद्. (“बलसागर तुझी वीरशिरोमणी” - या चालीवर) - स्त्रीजातीला पुरुष कसे हे अवघे वागविती, बंधो राया ! ठावें तुजला, मुळिं त्यां नच भीती ! ॥ ध्रु० ॥ द्वारींच्या रे श्वानाहुनि त्यां तुच्छ नीच गणती, ाळपणच त्यां श्वशुरगृहाला निष्ठुर धाडीती; पैशाकरितां वृद्ध अपंगा अर्भक वोपीती, · स्वातंत्र्याला नष्ट करोनी गुलाम बनवीती ! १३