पान:इंदिरा.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४३ परिसुनि वचना या तुच्छ ऐशा, सुवीर खवळुनि मनिं गेला चंद्रकेतू कुमार; शशिवदन ह्मणाला योजुनी वाणि क्रुद्धा:- "समर करूं, चला, या, सिद्ध व्हा मल्लयुद्धा ! ९३ सकळ चमु कशाला पाहिजे ? कारणीं या नरगणसमुहाचा तो नको नाश व्हाया; निवडुनि प्रति-पक्षीं योग्यसे मल्ल तीन, लढुनि उलगडा हो टाकुं या की करोन !” ९४ दिंडी. चंद्रकेतूचा स्फुरे बाहुदंड, ह्मणे:- “प्रतिपक्षा जिंकिलें उदंड, तरी मिळणें ना हस्त इंदिरेचा; अंत एकचि तो पुढें व्हावयाचा ! ९५ श्लोक. परी हे हिणावोनि जैं दाविताती, तरी इष्ट, कीं दावुं या बाहुशक्ती; जरी वस्त्र ल्यालों मिषानें स्त्रियांचें, तरी शौर्य का नष्ट झालें भुजांचें ? ९६ असो कांहिं होवो, मिळो ना मिळो ती, लहूं संगरी मल्लयुद्धीं सनीती; बळा दाखवूं, नांव राखूं कुळाचें; पुढें पाहुं, ती इंदिरा केविं नाचे". ९७ दिंडी. वीरभद्रे तैं युक्ति काढियेली ह्मणेः-“भगिनीतें लिहुनि येचि काली सांगुं तिज, कीं जें ठरे मल्लयुद्धीं, आचरावें तें पुढें शुद्ध-बुद्धी". ९८