पान:इंदिरा.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ स्वभावें कोपी ती, कठिण ह्मणुनी काढि वचना; असे योग्या वाणी परम असिया दुर्धर जनां; नरां-हातें का ना जगिं अमित अन्याय घडती? स्त्रिया जैं शोकाच्या जलधिमधिं त्या पूर्ण बुडती. ८७ असे शपथ वाहिली भगिनिकार्य साधीन मी; सदा पुरुषपाय ते गरिब बापुडी स्त्री नमी; स्वयें करिन शासना, जरि दिसे न शास्ता कुणी; स्वतंत्र करण्या स्त्रियां झटत इंदिरा सद्गुणी." ८८ दिंडी. युग्म वाणि ऐकुनि ही, चंद्रकेतु कांहीं वीरभद्रातें बोललाचि नाहीं; तिघां भ्रात्यांहीं अर्थ काढियेला, चंद्रकेतु किं तो भयाभीत झाला. ८९ श्लोक. ( ह्मणे चंद्रकेतू मनीं- 'युद्धयोगें | कशा वैमनस्या दुणावें निजांगे? | तदा बोलला एक त्या बंधुंतूनी पिळोनी मिशा, तोंडिं 'धिक् धिक्' वदोनीः– ९० “जसा वेष केला, तसें अंतरंग; | असा वीर, दावा तरी तेंवि रंग. | अहो भ्याड कां जाहलां आजि ऐसे ? (चला, शौर्य दावा, लढा शूर जैसे ! ९१ जो कंकणें करिं धरी ललनेपरी, तो दावी कसा ? कुठुनि त्या पुरुषार्थ येतो ? स्त्रीवेष घेउनि जयें तनु नीच केली, त्याची सुबुद्धि अवघी विलयास गेली." ९२