पान:इंदिरा.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४१ तिघां मध्यभागीं उभा वीरभद्र. जिथे जाइ तेथें करी सर्व भद्र; महा - बाहु-दंडें सजे शूरमूर्ती; रणीं गेहिं गाजे तयाची सुकीर्ति. ८० तिघे बंधु हे इंदिरेचे सुवीर तिच्या कारणीं प्राण देण्या तयार; विडा घेउनी इंदिरेच्या कृतीचा, उभाला रणीं बंधूंचा वर्ग साचा. ८१ त्रिपुत्रांसि एकीकडे नेउनीयां ह्मणे राय, “कां युद्ध येथें कराया तुझी पातलां हो? कशा हे विचार मनीं आणितां ? दुःख ये जैं अपार. ८२ नको युद्ध हो तें महा-शोक-कारी, जिवा नाशि, पाडी जनां व्यर्थ हारीं; नको जोडपें जोडण्या प्राणहानी; विवाहासि द्यावे बळी कां जनांनीं?" ८३ ( परिसुनि जनकाचे शब्द ते, वीरभद्र स्फुरत बहुत बोले, तापला जेंवि रुद्र:- | "दडवुनि जनका हो! आपणां आज कालीं | चमुसह नगरी जैं वेष्टिली दुःखशाली, ८४ समरिं करिन त्यांचें योग्यसें पारिपत्य; | भगिनि-कृतिस द्यावी पुष्टि; हो हेतु स्तुत्य ! | सकळ भगिनि-वाणी सार्थ मातें गमे ती; ( नरकरिं बहु दुःखें भोगिते नारि-जाती. ८५ इथे आणोनी तो प्रबळ चमु सत्यध्वज करी उगा संग्रामातें; यश न कधिं येणें तदुपरी; मला भीती आहे अजि कवण संग्राम करण्या ? कधीं कोणा नाहीं भगिनि मिळणें माझि वरण्या. ८६ युग्म