पान:इंदिरा.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० श्लोक. असें ह्मणुनि राजिया, धरि गजेंद्र हात तिघे सुमित्र; मग जावया निजसुतेकडे तो निघे; “करा सफळ कार्य हें शुभ" वदोनि सत्यध्वज, शिरीं स्वतनयाचिया वरद हस्त ठेवी निज. ७४ निघाले मार्गी तैं, जिथ तिथ दिसे रम्य वसुधा; वसंताची शोभा सुखवि नयनांलागि विविधा; स्वसंतोषीं नाना गढुनि फिरती पक्षि गगनीं, तरूमाथीं मंजुस्वन करिति ते गान बसुनी. ७५ दिंडी. रंग आकाशीं विकसले अनेक; सुहृद रमविति मधुवचें एकमेक; लतापुष्पें सुखविती जागजागीं; चंद्रकेतुस ना चैन अंतरंगीं. ७६ शांत भोंवति तें सर्व शोभताहे, समर-चिंता तो मनीं तदा वाहे; वधूप्राप्ती ज्या भरुनि चित्तिं गेली, काय होई त्या सृष्टि विकसलेली? ७७ अंधबधिरासम चालला असे तो मननिं गढलेला; चित्तिं एक हेतो, केविं संगरिं ती होइ यशःप्राप्ती ? मिळे जाया की अंतिं न ये हातीं ? ७८ श्लोक. सामोरे इतक्यांत धांवत तिघे तैं स्वार ते पातले; राजा देखुनियां गजेंद्र अपुला, हर्षे तिघे गर्जलेः- "राया ! व्हा विजयी ! " "तुझा कुशळ हो ! " राजा वढ़े त्यांजला; आला राय गजेंद्र तो सुखि पुन्हा, आनंद तैं गाजला. ७९