पान:इंदिरा.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३९ मजवरि उपकार त्वां नृपा थोर केला; सतत, नृपति! माझा मानही राखियेला; कधिं मम अपमाना कोणच्याही प्रकारें स्वकर-परकरें वा नाहिं केलें तुवां रे ! ७० पद. ( "आला वनमाळी रात्रीं”—–या चालीवर. ) धाडीं माझ्या संगें आतां, पुत्र नृपा आपुला; देतों त्यातें माझी कन्या, निश्चय मी पूर्ण केला.॥ध्रु०॥ घेउनी जातों तेथें सांगातें मी त्याजला, वीरभद्र जेथें आहे संगरास पातला; वीरभद्र पाहूं काय सांगतो या वेळीं मला, त्याचाहि विचार घेऊं, जाणे पूर्ण इंदिरेला; करोनी विचार आह्मी काढुं योग्य युक्तिला; बंधु सांगे तैसें करणें भाग पडे भगिनीला; ॥ १ ॥ धाडीं माझ्या०. ७१ दिंडी. बंधुवचना ती नाहिं मोडणार; असे बंधूवरि भगिनिभाव थोर; बंधु सांगे तें भगिनिला प्रमाण, बंधुकरितां अर्पील पंच प्राण.७२ साकी. कमलाक्षा, शशिवदना, तुझंही आह्मांसंगें यावें; पंचक आपण विचार करूं या, आतां काय करावें ? कांहीं युक्ति सुचे, । न जाणों, वळवूं मन तीचें." ७३