पान:इंदिरा.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ कसे वागवीतों स्त्रियां दुष्टरीती ! नसे कोणि शास्ता, जिवातें न भीती; नसे बोलणें इंदिरेचें खरें का ! स्त्रिया सर्व त्या मारिती का न हांका ! ६४ न का स्तुत्य हेतू असे इंदिरेचा ! न कां तथ्य जाणां ? तिची सत्य वाचा; अहो वागवीतों स्त्रियां योग्य रीती, तरी मागणें आज कां हें करी ती ? " ६५ गजेंद्र बोले "वदसी खरें तूं; असे कुमारी-मनिं योग्य हेतू; असे तिची वाणि परी कठोर; खरें तुझें वाक्य सुयोग्य थोर. ६६ किति तरि सुख होतें माझिया अंतराला! तुज जरि वरिती ती योग्य वीरास बाला, वर तिज मिळुनीयां, इष्ट तूतेंहि तैशी उचित अशि वधूटी प्राप्त होती सुवंशी. ६७ दिंडी. परी अनुरक्ता तुजवरि ती नाहीं, थोर माझें दुर्भाग्य तिचें तेंही!” चंद्रकेतूला नृप गजेंद्र ऐसे बदुनि, परिसा तत्पित्या ह्मणे कैसें:- ६८ श्लोक. “अरे आलासी तूं अजि नृपवरा युद्ध करण्या, मला ठेवीलेंसी इथ नजरकैदेंत बसण्या; तुझा आतां आला तनय परतोनी तुजकडे, तया घेई राया; मम शिरिं न जें यावरि घडे. ६९