पान:इंदिरा.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३७ दिंडी. काय वाघीण किं सर्प कुण्या काळी कोष्टियाच्या धरुं पकडुं येत जाळीं ? प्रेमपाशीं का इंदिरा मिळे ती ? जिंकियेल्याविण न ती येइ हातीं." ५८ श्लोक. बोले राजकुमार तैं स्वपितया:- “स्त्री-जातिचे पारखी आहां; तात ! वदाचि, एक असते स्त्री का दुजी सारखी ? पुष्पांमाजि जशीं गुलाब बकुळी जाई जुई मोगरी चांफा जास्वन पारिजातक, तशा होती स्त्रियांच्या परी ५९ कोणी शीतल शांतशा सुमधुरा अत्यंत सुप्रेमळ, शब्दें आचरणें जनां सुखविती, चित्तीं सदा निर्मळ; कोणी केवळ भांडखोर बसती भांडोनि कोनाफटीं; कोणी लाविति शीघ्रकोपि, जिकडे जाती तिथें आगटी. ६० कोणा संगर आवडे; रणिं पडे वा शत्रुला पाडितो, तो वाटे वरण्यास योग्य कुणिकां, जो मृत्युशीं भीडतो; कोणा आवडती गृहें; कुणि तिथे बाळांमुलांभीतरीं आनंदें रमती; अशा असति हो नाना स्त्रियांच्या परी. ६१ न का युद्धालागीं प्रबळ दिसते राजतनया ! असे अंगीं तीच्या बळ निकरिं जें ये समुदया; महा-शौर्याच्या ती सकल मनुजां लाजवितसे; नखीं जैसा कान्हू गिरि उचलितां, ही तशि दिसे.६२ पहा इंदिरेची कृती काय मोठी ! जणूं सृष्टिला शेष घेई स्वपृष्ठीं ! करा हो मनीं अल्प, ताता ! विचार, किती स्त्रीजना दुःख देतों अपार ६३