पान:इंदिरा.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ विश्व पालथिलें, जलधि शोषियेला, अद्रिअद्रीचा चुरा जरिहि केला, अतुल ऐशा जरि बळा दावियेलें, ह्मणुनि काय तिचें प्रेम साधियेलें ? ५२ धरुनि बांधियलें, गुलामही केलें, ह्मणुनि काय तिचें हृदय जिंकियेलें ? जरी संगरिं ती हरुनि बद्ध जाई, तरी मानस का तिचें साध्य होई ? ५३ श्लोक. जो जो सायक जाय येथुनि, सुटे जो बार बंदूकिचा, लागो तो न कुणा, करू नचि इजा, होवो न तोटा तिचा; ते ते अंतर पाडतील अवघे आह्मांमधीं निश्चित, लग्नाचा मुळिं हेतु जाइल वृथा, हें मी करीं भाकित." ५४ सुतास वदला पिता, करुनि कोप, सत्यध्वजः- “अरे बटु- विचार हे पडति कामिं ना, त्यज; मुला! वळखशी न तूं, परम गूढ हा स्त्रीजन; जगीं फिरुनि पाहशी, तरिच पालटे त्वन्मन. ५५ असे नर सुपारधी, सुखद् नारि त्या पारध; जगा वळखिती पुरे, सकळ बोलती ते बुध; रुपा भुलुनियां, तिची नर करीतसे पारध; त्वचे भुलुनि, पारधी करि जसा मृगीचा वध. ५६ अरे या स्त्रिया शूर -वीरां पुजीती, बळा बाहुच्या जे तयां दाखवीती; नसे जें स्त्रियां - अंगि तें शौर्य दावी, असे तो स्त्रियां वंद्य धीर-स्वभावी. ५७