पान:इंदिरा.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३५ साकी. गजेंद्रनृप या परिसुनि वचना चंद्रकेतुला बोले:- "वाटतसे मम बाळेच्या गृहिं असतिल हालचि झाले; लोभ तिचा धरिशी, । वद कीं संग्रामा करिशी”. ४६ श्लोक. "नसे संग्रामाची मम हृदयिं इच्छा मुळिंच ती, न तो ये हो काम" नृपतनय बोले निजमती; " न होई कल्पांतीं कुशळविधि ऐशाहि दुरितीं; गमे, लग्नासाठीं समर करितां, त्या न सुगती. ४७ आधींच मी तिज दिसें नर दुष्ट खोटा, संग्राम तो घडलिया मग पूर्ण तोटा; साव्या नरां-पद्रिंचें मज डोई पाप येईल; होइल पुरा मम कार्यलोप. ४८ दिंडी. तिच्या कार्याच्या आड पुरुष येई, पूज्यबुद्धी तिचि नुरे तया-ठाई; जरी कोणी विध्वंसि तिच्या कार्या, तया पुत्री धिक्कार तुझी आर्या ! ४९ रक्तपातें हैं काम होत नाहीं, तोफभडिमारें वा न सायकांहीं; हृदयिं प्रेमाचे पाहिजेत गेले बाण कोमळ, तिथ भिडुनि राहियेले. ५० तिच्या प्रेमाची मज असे अपेक्षा; लग्न न रुचे मज किमपि नाहिंपेक्षां; वरुनि काय करूं ? जीस नावडें मी; कशी शांती नांदेल अशा धामीं ! ५१