पान:इंदिरा.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिंडी. काय छावणिंमधिं वर्त्तमान झालें, पुढें परिसा तें काय घडुनि आलें; बंधु तेथें तो दिव्य इंदिरेचा करुनि आला संकेत संगराचा. ४० इंदिरेचा प्रिय वीरभद्र बंधू खऱ्या धैर्याचा पूर्ण शौर्य-सिंधू भगिनिकार्याचा जेथ नाश झाला, पारिपत्याकारणें तेथ आला. ४१ श्लोक. चंद्रकेतु हें वृत्त ऐकुनी, मूच्छितांगना तेथ ठेवुनी, मित्र संगतीं घेउनी निघे; रंगभूमितें पावती तिघे. ४२ राजे दोन्हि तिथें करीत बसती संवाद लग्नाविशीं; “पुत्रातें तनया विवाहिं" ह्मटलें सत्यध्वजें “दे कशी; देवोनी बहु लाड रे तिज नृपा वेडाविलें त्वां अधीं, आतां एवढि मातली न धरितां येणार हातीं कधीं. ४३ नरां सारियां सर्वदा तुच्छ मानी, जगाची करी आपुली तेविं हानी; करी भग्न माझ्या सुताचीहि आशा; ह्मणे 'ना, ' तरी युद्धिं पावेल नाशा. ४४ करूं युद्धसंग्राम तीतें हराया, नृपा ! गाजवूं जाण शस्त्रें करीं या, हरूं गर्व तीचा, करूं पारिपत्य, करूं लग्न रे, देवुं तीतें अपत्य. " ४५ 6