पान:इंदिरा.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३३ चुकी थोर झाली सुते टाकियेलें तिथे एकटीला; कुठे चित्त गेलें ? जये वेळिं कल्लोळ केला स्त्रियांनीं, मुळीं भान गेलें; तिघे सर्व ध्यानीं. ३४ द्वारीं जाउनि बैसतें रडत मी त्या राजकन्येचिया; मागोनी मम कन्यका, उठवितें पोटीं तिच्या मी दया; आक्रोशें रडुनी तिथे गडबडां लोळेन भूमीवरी; नाना अन्य उपाय योजिन असे कीं ती द्रवे अंतरीं. ३५ नाहीं मी उठणार तेथुनि जरी कन्या न माझी मिळे; घेवोनी मग बाळका मधुर त्या चुंबीन मी मंजुळे; हा कन्ये मधुरे सुरम्य-वदने ! हा वत्सले कोमले ! माता दुष्ट किती तुझी, परकरी कीं तूजला टाकिलें. ३६ ऋणी जन्माची तो करिल मज, जो देववि सुता; अहो जन्मोजन्मीं स्मरिन उपकारांसि विनता; विनंती माझी जो परिसुनि करी साह्य, करवी, तयाच्या मी सान्या सकळ मनिंचे हेतु पुरवीं." ३७ “नको खंती होऊं” शशिवदन बोले तयिं तिलाः- "प्रिया कन्या तूझी कमळवदना देववुं तुला; " सुखाची वाणी ही परिसुनि पुन्हा भूमिवरती पडे; मूर्च्छा आली; मग कमलजा हालत न ती. ३८ अहो पोटचा जाळ का अल्प आहे ? वियोगाग्नि का सारियांलागि साहे ? कुणाचीं कितीही मनें दुष्ट होती, परी पोटिंचें बाळ ना त्यागिती तीं. ३९ - १२