पान:इंदिरा.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ साकी. शशिवदनें तिज ह्मटलें:- “साध्वी न करीं गे! तूं खेदा; शांत राहिं तूं, जें झालें तें ना हो कारण वादा; मुलीकडे पाहें; । तिचियासाठीं जगिं राहें". २८ श्लोक. परिसुनि तयिं नामा आपुल्या अर्भकाच्या, ढळ ढळ रडुं लागे, ना शके वर्ण वाचा; तटतट कच तोडी, धाय ती मोकलूनी; धडपड जिविं लागे, कंप अंगीं सुटोनी. २९ बोले:- "बाले कमलवदने ! वत्सले माझिये गे ! आलें नाहीं मनिं, किति तुझे हाल होती वियोगें ! हातांतूनी निजपदरिंचें घालवीलें सुरत्न, आतां कन्या परत मिळण्या मी करूं काय यत्न ! ३० टाकीलें म्यां तुजशिं तिकडे, काय चांडाळ माता ! माझी कन्या ह्मणुनि तुजला दोष गे येत जातां देवोनीयां पिडितिल सदा, निश्चयें जाणतें हैं; कैशी बुद्धी उपजलि अशी ! दैन्य मातें न साहे. ३१ ह्मणतिल तिचि होती माय ह्या ह्या प्रतीची; करितिल मम निंदा तोडण्या प्रीत तीची; उडवुनि मन तीचें स्वीय माते-वरोनी, करितिल तिज दुष्टा, कर्ण तीचे भरोनी. ३२ मग मज कधिं ना ती ओळखीणार बाळी! जरि कधिं वळखीलें कोणाच्याही सुकाळीं, वळखिल, परि बुद्ध्या दूर राहील बाला, कृति अशि घडल्या का सौख्य वाटे मनाला ? ३३