पान:इंदिरा.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३१ निजबंधूचा, नृपतनयाचा । प्राण कधीं का हरिशी ? भगिनी० २ शपथ मोडिली, ठीकचि झालें, । होत्ये ती पूर्ण कशी ? भगिनी० ३.२३ श्लोक. ह्मणे कमलजेप्रती नृपकुमार तो कोमळ:- "अगे सुतरुणी नको हृदयि होउं तूं विव्हळ; मनासि करिं शांत तूं; मजहि काय धोका नसे ? वधूसि मुकलों पुरा ! कशि ग इंदिरा ती दिसे ?” २४ दिंडी. - तिनें आयकिली राज-तनय-वाणी; स्फुंदस्फुंदोनी नयनिं ढाळि पाणी; पदर सांवरुनी मुखावरी घेई; उठुनि बैसे, जिथ पडलि तेचि ठायीं. २५ पद. जिल्हा झिंझोटी, ताल दादरा. “दुर्धर या वैधव्यव्रता केविं आचरूं" या चालीवर. [सं. सौभाग्यरमा नाटक ]. "हर ! हर ! हर !" ह्मणे काय घात असा केला ? स्वामि- णिच्या कार्याचा हिरमोड झाला ! ध्रु० काय अशी पापिण मी, । दुर्दशाचि सकळ कामिं । करुनि कलह निजधामीं । घोर मांडिला; हर ! हर ! १ स्वामिणि मज अंतरली; । काय अशी बुद्धि भ्रमली; । जागा जगिं मुळिं नुरली । तोंड दाविण्याला || हर० ।। २६ श्लोक. मोडियलें म्यां सद्वचना, । दावुं कसें हें तोंड जनां ! रक्षियलें माझ्या अनुजा, । नाशियलें तैं व्यर्थ दुजां. २७