पान:इंदिरा.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० पुन्हा तिघे भेटति एक ठायां विशेष तैं स्वानुभवा कथाया; तदा वदे तो शशि :- “ऐक आलों कसा इथे, छावणिमाजि ठेलों.” १८ ह्मणे:- “मद्याच्या रे प्रबळ बहु मादें तुडविला बुझालों; चिंतेनें भ्रमण करितां देह दुमला; पथीं जातां जातां प्रिय कमलजा भेटलि मला; इथे आलों दोघें; चल, जिथ तिचा देह पडला. १९ न बोलेचि कांहीं, न कांहींच लक्षी, न पाणी पिई, अन्नही ती न भक्षी; असे चालवीली क्रिया रोदनाची, स्थिती जाहली ऐसि तीच्या मनाची." २० पडलि जिथ असे ती, पातले तेथ सारे; बघुनि तिज निचेष्टा, दुःखिता या प्रकारें, द्रवति सुहृद चित्तीं; बंधु बैसोनि पाशीं, उचलुनि भगिनीचा हस्त घेई उराशीं. २१ “भगिनि गे! नयनें उघडीं भली, पहुं नको अशि गे, तनु कोमली; करिशि काय ? तुझा नचि दोष तो; भगिनिहस्त न बंधुसि मारितो. २२ पद. राग काफी, ताल दीपचंदी. ( "भोलानाथ दिगंबर” या चालीवर. ) घडलें जें आजि घडों दे तयातें, कां खिन्न होशी अशी ? भगिनी, कां खिन्न होशी अशी ? ध्रु० गतगोष्टीचें, मनन करोनी । व्यर्थ हृदीं ही हाय धरिशी ? भगिनी, कां खिन्न० १