पान:इंदिरा.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२९ तदा सुत वदे पित्याः- "करुनि काय तो संगर ? वळेल कुमरी कशी ? वढुं शके न कोणी नर; शरीर जरि पावलें, तरि तिचें मिळे का मन ? न हेत मनिं तो जरी, तरि वृथा सुभार्या -धन.” १२ साकी. - बोलुनि ऐसें पित्यास विनयें, डेन्यांतूनि निघाला; अपणासाठीं तंबु मागवुनि मित्रासह तिथ गेला; वेषा उतराया, । युद्धा सिद्ध तदा व्हाया. १३ श्लोक. जसा तो विद्यार्थी स्वमनिं अपराधा स्मरुनियां, गुरू देखीयेल्या लपत असतो पावुनि भया, तसे ते दोघेही लपत समुदायांत निघती; स्त्रियांच्या वस्त्रातें शरमुनि मनीं शीघ्र पळती. १४ तदा नारिवेषा त्यजोनी, पुन्हा ते नरांसारखे घेति शस्त्रें स्वहस्तें; नरांचा नरां वेष जो नित्य साजे, झणीं त्यांहिं केला; नरश्री विराजे. १५ असे जाहली या घडीं सुप्रभात, रवी रश्मिनीं पूर्व ती शोभवीत; निघाले पुढे जावया श्रांत-गात्र, शशी भेटला तों, तिथे प्राणमित्र. १६ ओशाळला तैं शशि पूर्ण रीतीं, केल्या कृतीची जिविं फार भीती; केली क्षमा त्यांहिं परस्परांतें- — जो मारि, जो गाइ अभद्र गीतें. १७