पान:इंदिरा.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ तंबूंत आले मग ते सुमित्र; बैसे जिथे राय, तिथें सुपुत्र प्रेमें उभा जोडुनि हस्त ठेला; साष्टांग राया प्रणिपात केला. ६ जसे तंबूमाजी युवति-वसनीं मित्र शिरले, तयांच्या रूपाला सकळ बघुनी वीर हंसले; श्रमानें रात्रींच्या विसकळित पोशाक सगळा असे झाला; अंगावरि उधळला मार्गि धुरळा. ७ दिंडी. जळें रायाचे नेत्र भरुनि गेले, उडुनि गेलेले प्राण पंच आले; पुत्र पाहुनि मनिं राय पूर्ण धाला; समर केल्याविण पुत्र करीं आला. ८ श्लोक. बघुनि निजसुपुत्रा राय बोले गजेंद्रा:- "निजगृहिं अजि जावें ये क्षण हे नरेंद्रा ! सुरळित मम आला पुत्र हा चंद्रकेतू; तदुपरि इथं तुह्मां ठेविण्या नाहिं हेतू." ९ तदा न्याहळोनी स्वपुत्रा वदे तो:- “अरे काय हें रूप बा चंद्रकेतो! कुठे रंग गेला, कुठे तें शरीर ! वधू-शुद्धिला हे किती यत्न घोर ! १० जा बाळा, उतरोनि वेष झणि हा, राहें उभा संगरा; ठेवीं एकिकडेस हा युवतिचा संभार, ना साजरा; केलीसे शशिनें निवेदन कथा साद्यंत पुत्रा मला; आले बंधु तिचे, तयां समरिं तूं जिंकावया जा भला. "११ -