पान:इंदिरा.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगरनामक सर्ग पांचवा. दिंडी. मंदिराच्या बाहेर लाविलेले मित्र गांवाच्या शिंवेपार गेले; मार्ग धरिला तायें थेट उत्तरेचा, दिसत होता जिथ थाट संगराचा. १ श्लोक. जिथे स्थापिलें सैन्य सत्यध्वजानें, तिथे पातले दीन झाले श्रमानें; शिवेंपाशिं येतां तया छावणीचा पुसे त्याजला गाडदी पाहण्याचा: - २ " असां कोण दोघी, कुठे जात आहां ? कशा येथ आलां ? खुलासा करा हा." ह्मणे चंद्रकेतूः–– “अहो मैत्रिणी हों, इथे राजभेटीप्रती पातलों हो." ३ ह्मणे गाडदी:-

- " जा तुह्मां भेट होई,

महाराज ते बैसती तंबुठायीं;" दिला तंबु दावावयाला शिपाई • तया गाडद्यानें, करूनी भलाई. ४ निधुनि तिथुनि जाती तंबुच्या थेट वाटे, स्थळ जिथतिथ दाटे तंबुच्या शुभ्र थाटें; नर-गणिं गुणि योद्धे वीर ते सर्व आले, सकळ वसति डेण्यांमाजि ते आपुलाले. ५