पान:इंदिरा.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ श्लोक. अरे निघुनि आलिया परत मार्गि जाई सुखें ! न पाहवत हें तुझें वदन कज्जलासारखें; स्वरूप बदलोनियां करिशि वेष हा मीपणे मलाचि फसवावया; फसशि तूं स्वयें; धिग् जिणें ! १९७ अगे कोण आहे तिथे ? यास दावा गृहीं जावया मार्ग ! वाटेस लावा ! नको लांडगे येथ हे क्रूर-दृष्टी, करा यांचिये पृष्ठिं हो मुष्टि-वृष्टी." १९८ वाणी ऐकुनि क्रुद्ध ऐशि, निघती तेथोनि आठ स्त्रिया, अंगीं ज्या बहु धष्टपुष्ट दिसती, ज्या जाणती ना दया; त्यांनीं घट्ट धरोनि दोन नट ते लोटीत नेले सवें; गेले हिर्मुसले; अपार हंसल्या त्या नारि एक्या रखें ! १९९ दिंडी. अंत वेषाचा शोचनीय झाला; वधू-प्राप्तीचा फुकट काळ गेला ! परी आशा नचि जाइ अंतरींची, गेलि कोंदुनि मनिं मूर्ति इंदिरेची. २०० चवथा सर्ग समाप्त.