पान:इंदिरा.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२५ पंजाबी कुंबरी. राग केसुरी-ताल त्रिवट. वर मिळवाया लग्न करावें, सासरिं स्वातंत्र्यचि बुडवावें ॥ ध्रु० ॥ सुदैव तें, जरि माउलि सासू; सदैव ना तरि नयनीं आसू; १ नणंदेच्या परिसावें घसया; चाहड्या नाशिति सासुसासण्या; २ व्यर्थ मत्सरें भांडति जावा, भांडविती मग भावांभावां; ३ इतुकें सोसुनि, पतिची जरि कां प्रीत नसे, तरि आयुष्य फुका; ४ कोण विवाहित, सासुरवासा सासूच्या ना जाणत लासा ? ५ नांवाकरितां अंगावरतीं दागदागिना लादुनि देती; ६ परि दासत्वा पार नसे तो, हा अनुभव रे लग्नीं येतो ! ७ १९५ पद. राग हमीर, ताल त्रिवट. ( असो धिग धिग-या चालीवर ). नसे तिळभर भीति का जिवाला- येवोनी मागशी तूं मजशी वरण्याला ? ध्रु० दिसे घोर उडी ही रे तुझि मजला; आलासि कां व्यर्थ इथे आजि मरण्याला? नसे तिळभर० १ १९६ —