पान:इंदिरा.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ "जळिं तरि बुडलीना माझि कां सर्व काया ! परम करुण दैवें प्राण हा वांचवाया अवचित तुज कां तें धाडिलें योग्य काळीं ? नवरि करुन नेण्या ? दास्य येण्या कपाळीं ? १९१ पद. राग खमाज ताल त्रिवट. (“ अवचित त्या उपवनीं करुणासागर दृष्टिस पडला " ) या चालीवर. [सं० सौभाग्यरमा नाटक. ]. वरण्या कीं तव दासी करण्या इच्छिसि तूं हे नृपतनया ! परहस्तीं का तनु ही द्यावी निजकार्यातें मोडुनियां ? ध्रु० वरतां तुजला मम स्वातंत्र्या अंत अकाळीं येउनियां, हानी सारी निश्चित होइल, थोर निराशा स्त्रीजनिं या ! वरण्या कीं० अमोल काया काय फुकावी नित्य गुलामी करोनियां ? पुरुषांचे विण गत्यंतर ना, काय ह्मणावें याचि नया ! वरण्या कीं० १९२ श्लोक. ह्मणसि काय रे लग्न योजिलें ? कृतिस कोणिं रे ! या रुकारिलें ? जनक-कृत्य हें ना रुचे मला, न विकिली असें जाण तैं तुला. १९३ विशाळा ऐशी ही पृथिवि घटती हेममय ती तया हेमाचा रे मुकुट करुनी, त्याहि वरती नगांचे सायाही बनवुनि हिरे त्वां जडविले, तरी ना तद्लोभें मम मन वळे; पूर्ण ठरले. १९४