पान:इंदिरा.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२३ हंसति करुनि मुद्रा इंदिरा राजपुत्रा मधुर वच कृतज्ञा बोलली चारुगात्रा:- “नरवरमणि रे तूं शोभसी दिव्य साचा, खुलविशि कुळकीर्ती; वर्ग तैसा नरांचा ? १८५ कधिं तव उपकारा अंत येणार नाहीं, निजतनु जगताहे युक्तिमात्रे तुझ्या ही; परम करुनि धैर्या प्राण हा वांचवीला, मम कृतिस तुझा तैं साह्य बा देह झाला." १८६ मग घडीमधिं ये तिज विस्मृती, नृपसुतें स्वकरीं नदिमाजि ती सुतनु रक्षिलि सद्गुणि सुंदरा, परम वंद्य स्त्रियां प्रति इंदिरा. १८७ आर्या. निजदेहाचें रक्षण झालें नृपसुतकरीं जरी होतें, धिक्कारयुक्त शब्दां योजुनि नृपजा तदा वदे त्यातें:- १८८ श्लोक. "बहुत वसनिं या रे शोभसी राजपुत्रा ! कृति मज नुमजे त्वां केलि कां ही विचित्रा; समर करुनि न्याया आणिलें काय सैन्य ! नवरि करूं पहाशी, काय हें थोर दैन्य !” १८९ अशि विडंबुनि ती वदतां तया, स्मरण ये, कृति पाववि तो लया; स्मरणि त्या क्षणि होइ उदास ती; कळवळोनि बहू बदली सती. १९०