पान:इंदिरा.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ ही भीती मनिं बाळगा अशि फुका, अन्याय ना तूमचा, झाली आजि सहस्र - वर्ष-गति की दासत्व अस्थित्वचा- माजी हें खिळुनी, तुझी सकळ त्या झालां असा भ्याडशा; काळें निश्चय पालटेल, तुमची दुःखास्पदा ही दशा. १७९ रहा गे उग्या सर्व ! कल्लोळ कां हा ? महानर्थ ऐसा फुका मांडिताहां ? तुझांलागि देईन मी हांकुनीयां ! स्वधामास जा ! घालवा जन्म वायां. १८० वहावा तुझीं तो जळघट शिरीं पूर्ण भरला; भरोनी त्या हातीं, जरि तनुमधीं प्राण उरला, धुवावें, चोळावें, निसण-टिपणा नित्य नियमें करावें; हें तुह्मां रुचत बरवेंसें मज गमे. १८१ तुह्मां हें न शोभेचि स्वातंत्र्य साचें; तुह्मां गोड तें दास्य वाटे नरांचें; कराया सदा आवडे त्यांचि सेवा, जणूं स्त्री सुखाचा नरां-हातिं ठेवा ! १८२ बसा बोलती ते, तदा हो बसावें; उठा बोलती, तैं तुझीं हो उठावें; जसें नाचवीती, तसें सर्व भावें सदा नाचुनी आयुषा घालवावें.” १८३ ऐकोनि वाणी अशि इंदिरेची, गर्दी निमाली तिकडे स्त्रियांची; झुंडी तयांच्या फुटल्या समस्त, संग्राम ज्या ऐकुनि भीतिग्रस्त. १८४