पान:इंदिरा.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२१ मुखांतून येणार आतां फुटोनी अती क्रुद्ध वाणी, असें ये दिसोनी; पडे नाद तो कर्ण, कल्लोळ माजे; स्त्रिया बोलती भोंवतें सैन्य गाजे. १७४ साक्या. झंजा - मारुत येउनि जैसा उडवितसे फुलपाना, नानारंगी नानारूपी नाचवि आकृति नाना, तैशा तिथ नारी, | गेल्या भिउनी अंतरी. १. कोणी ह्मणती सैन्य पातलें, नगरा वेष्टि सभोंतीं; कोणी ह्मणती येऊं द्या तें, काय घडे त्या हातीं. ऐशा घोंटाळीं । पडलें मंदिर त्या वेळीं. २. १७५ श्लोक. क्रोधें तप्त जहालि ती परिसुनी ऐशा वृथा कल्पना; आवेशें खिडकीशिं येउनि सती सोडोनियां आसना, बोले त्या सकळ स्त्रियां- प्रति कटू शब्दीं बहू ताडुनी:- “कां ऐशा मतिहीन आजि बनलां, गेलां भयें नाडुनी ? १७६ आहे स्वामिण मृत्युनें तुमचि का आजीच ती ग्रासिली ? कार्यों का तिचियांत शक्ति नुरली रक्षावया आपुलीं ? मी, मी, मी अजि मी पहा जगतसें, साहीन मी एकटी सान्या त्या नरसायकां; युवतिनों ! रक्षीं तुह्मां संकटीं! १७७ युद्धा जाइन मी, लढेन समरीं मत्कार्य रक्षावया; येतां मृत्यु रणीं तिथेहि लढतां अर्पीन देहास या; घेवोनी करिं कार्य यापरि महत् सप्रेम तें एकदा, त्यागी का कुणि त्या मधींच ? कृति मी त्यागीं न माझी कदा. ११