पान:इंदिरा.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० माझा देह न हा, तुझाचि अवधा; अर्धा तुझ्यावीण गे ! राहें या जगतीं, जरी वरिसि तूं, मी पूर्ण तैं तो जगें !१६६ आर्या. गरिबां सौख्यद धन तें, आजाण्यां स्वास्थ्य जेविं वाटे तें, तैशी मज वाटशि तूं; किति सांगूंया मनासि सुख होतें. १६७ किति जरि'ना ! ना!' ह्मणशी, बहु आणोनी मनांत अविचार, पुरुषा त्यजिण्याचा तो व्यर्थ म्हणें घेशि तूं शिरीं भार. १६८ अग मज पुरुषा वाटे की व्हावें म्यां निराश नाचि कदा, परि बुद्धि-वादिं तुजशीं लढुनि वरावें तुझ्याचि गे सुपदां ! तत्प्राप्त्यर्थ जरी ये मरण तरी ही सुखेंचि येवो तें ! तुज -सम- भार्या - साधनं ह्मणतों वेंचीन सर्व आयूतें.” १७२ असें ह्मणुनि देइ तो करिं तिच्या जुनी पत्रिका, तिच्या सुजनकें तथा दिधल शोधण्या कन्यका; तया धरुनि पत्रिके, करि बहू सती क्रोध ती; न ती उघडितां, धरेवरति आपटीते सती. १७१ साकी. ऐसें पाहुनि चंद्रकेतु तो गुडघा टेंकुनि राहे इंदिरेचिया पायां पाशीं; तन्मनिं प्रेमा वाहे; पत्रा फेंकील्या, हातीं धरितो तिज द्याया. श्लोक. जसा पूर पाण्याचिया रुंद पाटीं, चढे लाट लाटांवरी, होइ दाटी; तसे शब्द येती तिच्या कंठनाळीं, महाओघ कीं लोटतो त्याचि वेळीं. १७३ १७२