पान:इंदिरा.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विशेषक. जसा काळवीटा मृदू गान-भोगीं असे मृत्यु, येतां न तो त्यासि त्यागी, परी गान ऐकें; म्हणे ‘देह जाये, तरी गानिं जावो, बिना ये बजाय्ये !' तसा मी ग ! राहीं तुझ्याही समोर; मला मारुं वाटे, तरी तूं हि मार! सुखें मी तुझ्या पायें येथें मरेन; न तूं मारिल्या, मी तुला गे वरीन ! १६२ जयीं पाहताहें तुझ्या या कृतीतें, तयीं मारिं मातें, जरी इष्ट तूतें; परी मारिल्या मागुतीं चर्म माझें अगे लाविं संपूर्ण तें द्वारिं तूझे. १६३ दिंडी. काळवीटासम पुन्हा मी वदें गे ! नको तूतें मी, तरी मारिं वेगें ! देह माझा हा करीं प्राणशून्य ! मला सुख ना तुजविणें उरे अन्य ! १६४ कोण माझ्याविण करी तुझी आशा सौख्यभोगाची, भुलुनि तुझ्या पाशां? भिकाऱ्यां तूं कशि धनिक सौख्यदात्री! वरीं मजला गे! प्रिये ! चारुगात्री ! १६५ श्लोक. येवो मृत्यु मला अधींच, विधिनें तो भाळिं या लेखिला; मातें जीव नको; कशा जागं असो, जो त्वांहि अव्हेरिला !