पान:इंदिरा.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ त्वद्वर्त्तना देखुनि या सुमंदिरीं, प्रेमा बळावे मनिं उत्तरोत्तरीं; ऐकें, वदें विस्मय पूर्ण पावुन- 'त्वत्कार्यि साया तुजला ग रक्षिन.' प्रत्यक्ष पाहोनि तुला ग ! इंदिरे ! तूं योग्य भार्या, मनिं खास हें भरे; प्रारंभि शीणोनि मनांत भंगलों, आतां तुला जाणुनि दंग जाहलों ! १५७ मातें वरोनी, करिं तृप्त या जिवा, भावी सुखा जो तुज होइ सांठवा; मातें वरील्या, ग! कृतार्थ होइन, भार्येप्रती जें सुख इष्ट देइनं. १५८ ज्या ज्या बाळकथा तुझ्या परिसल्या, ज्यांहीं मना मोदिलें, त्या त्या म्यां स्मरुनी इथे अनुभवें प्रत्यक्ष गे जाणिलें; वारंवार तुला परीक्षुनि अगे ! तूझ्याचि या मंदिरीं केला पूर्ण विचार कीं जरि वरीं कोणा, तुलाची तरी ! १५९ प्राणा या बळि सत्वरींच इथ घे तूं देवते इंदिरे ! पाडीं या तनुचे अनेक तुकडे, भावेल तैसे बरे; मृत्यूला इथ देह अर्पिन, जरी तो ना तुला गे रुचे; घालीं पायतणें तुझ्या सुपदिं गे! फाडोनि माझ्या त्वचे. १६०