पान:इंदिरा.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११७ जरी असतिस तूं, तिथे तरी जातों; तुला वरणें हा मुख्य मनीं हतो ! १५० श्लोक. तारुण्याची प्राप्त होतां अवस्था, लग्नाची मी बाळगोनीच आस्था आतां तूझ्या मंदिरिं येथ आलों, पाहोनीयां मी तुला पूर्ण धालों. १५१ या साज्या युवतींपुढे नचि शकें बोलूं मनीं वाहिं जें; सांगू इच्छितसें तुला, इथ तया मी ना कथाया धजें; वाहीलें सुविचारिं आजिवरि जें लोभे तुझ्या स्वांतरें, सांगावें तुज एकटीप्रतिच तें म्यां देवते इंदिरे ! १५२ केंद्रस्थ तूं मन्मनिं सूर्य होशी, साया सुखाची मज पूर्ण राशी; गे ! ऐक जें मी मनिं बाळगीं तें,- जें ज्ञानियां विश्वि दिसोनि येतें. १५३ नांवाजलेलीं, बहु गौरवीलिंशीं, ग्रामें, स्थळें, स्त्रीपुरुपें जरी, तशीं प्रत्यक्ष ना दर्शनिं पूर्ण भासती, काळें कळों ये परि योग्य तत्स्थिती. १५४ तूं इंदिरे शोभशि गा तशी पुरी; कालान्वयें वाटलिशी बरी बरी; तूं योग्य भार्या वरणीय सुंदरी; आशा तुझ्यार्थी दृढ होउ अंतरीं. १५५