पान:इंदिरा.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साकी. बाल्यापासुनि वृद्धावस्थेपर्यंत न मी माझा; तुझ्या चिंतनीं राहणार मी सर्वस्वीं गे ! तूझा. दाई बाळपणीं । मज तव कौतुक ती वर्णी. १४४ आर्या. जैशीं बोबडं बाळें मागति चंद्रा करांत झेलाया, तैसा बाळपणीं मीं मागतसें इंदिरेशिं खेळाया. १४५ पौगंडावस्थेमधिं उच्चा उच्चा स्थळीं ग! दिसलीशी, तेजाची राशी तूं मज गुण - शिकविति सदाहि वाटलिशी; १४६ झुळझुळ दक्षिण वायू उत्तर देशाप्रती तदा आले, माझ्या गृहांत, तैसे हृदयीं जावोनि ते तिथे खिळले. १४७ श्लोक. सकाळीं दुपारीं तिपारीं किं रात्रीं, वनीं मंदिरीं बागिं कीं नीरपात्रीं ध्वनी - "इंदिरा ! इंदिरा ! इंदिरा !” – हा सदा कानिं ये, पाडि अत्यंत मोहा ! १४८ दिंडी. हंसनायकही "इंदिरा" वदे तो; शब्द तोही सागरीं व्योमिं येतो! अगे ! चांदणि होवोनि ग्रहां-माजी नभीं असतिस, तरि नागलोकीं वा बनुनि नागकन्या, तिथे मिळणारी नवरि मला धन्या भेटतों जी ! १४९