पान:इंदिरा.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११५ अगे ! मी तुझ्या कार्यि विघ्नं कराया नसें येथ आलों; न हिंडा-फिराया; तुझें कार्य चालो ! असे हेचि इच्छा; तुला गे वरावें, मनीं हीच वांच्छा. १३८ साकी. ती वांच्छा त्वां पूर्ण करावी, ऐकुनि माझ्या बोला; तूं जें इच्छिशि, मान्य मला तें, नेइन सर्व तडीला; विचार करिं थोडा; तूं मी जुळवूं ये जोडा. १३९ श्लोक. स्त्रियांचा तिरस्कारि मी ना असें तो; स्त्रियां वंद्य मानोनि त्यां मान देतों; मनीं बाळगीतों सदा हेचि आस्था, घडो ती जशी योजिशी स्त्री व्यवस्था. १४० साक्या. ऐकें नृपजे ! जरि मी आहें पुरुष-कोटिचा प्राणी, भूतदया मम हृदयीं वसते पूर्ण, मनीं हें आणीं, साध्वी ! मनन करीं । गणतों तुज मीं सुविचारी. १४१ कामीं काजीं, उठणीं बसणीं, अशनीं प्राशनिं, शयनीं, झोंपत जागत स्वप्नीं तूं गे वससी संतत याचि मनीं; अर्पी कर मजला ! | देइन सौख्य पुरें तुजला. १४२ आर्या. क्रूरपणें स्त्रीजातिस पुरुष जरी ते अनेक वागविती, क्रूरपणें म्यां स्त्रीशीं वर्त्तावें ही मुळीं नसे वृत्ती. १४३