पान:इंदिरा.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ पद ( संगीत सौभद्रः अंक २, यांतील “ बघुनि उपवना " या चालीवर.) ऐश्वर्या घरदारा सोड्डुनि तुज वरण्या पातलों ! पडतां डोहीं वांचविण्या तव प्राणातें धांवलों ! डोहाच्या तळिं बुडी मारुनी, जळिं सन्निध ठाकलों; सांवरिली निर्जीव जणूं का; सुख मनिं बहु पावलों! प्राणदान गे! तुज दिधलें म्यां, काय ह्मणुनि दुरवलों ? नन्ना धरिला मुळापासुनी, हतभाग्य गं ! जाहलों; ॥ चाल || देह तुझा हा नसेचि हें समजुनी, । स्वयें शिल तूं तो मज, ह्मणवुनी । होशिल तूं मम भार्या सुखदायिनी । मानुनि मनिं गुणिं रूपिं न कमतर, तुज घ्याया पातलों ! प्रतिमा घोळे मानें निशिदिनिं, तव नादें वेडावलों ! ऐश्वर्या घरदारा सोडुनि० १३५ श्लोक. कितिहि वदशी 'नाहीं, नाहीं,' निराश न होई गे ! निजमानें घरीं ऐशी आशा, जरी तनु ही जगे, वळशिल अगे माझ्या ठायीं तुझें मन लागुनी; कर मजशिंदे, आलों, ठेलों, सुखा गृहिं त्यागुनी. १३६ पित्याचीहि इच्छा तुझ्या तैशि आहे, कधीं बोलसि 'हो,' अगे वाट पाहें; न आज्ञेविणें त्याचिया येथ आलों; पहा पत्रिका लग्निं जैं सिद्ध झालों. १३७