पान:इंदिरा.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११३ श्लोक पत्र वाचतां येथ थांबला, राजपुत्रिला स्पष्ट बोलला:- "पातलों न त्वत्कार्य-न - नाशक; द्वारिं येइं त्वत्पाणि-याचक. १३२ पद (होरी); रागिणी भैरवी, ताल- दीपचंदी. काय असा मीं अपराध केला, लोटूनि दिधलें त्वां गे मजला ? ध्रु० मज एकट्याला सोडुनी दिधलें, इतुकेंच नाहीं विपरीत घडलें; – १ • टाकुनि देशी सारे पुरुष ते, त्वत्कृति विस्मित जग तें बघतें; २ बाळपणापासूनि मीं हृदयीं ठेवीलें प्रेम तुझिये सुनामीं; ३ भावीत होतों संसारसुखाला, कां गे ! तुवां अंत गोड न केला ? ४ वरिन कुणा जरी, तुजची वरीन; हृदिं या दुज्या ना ललने धरीन ! ५ क्षत्रियपुत्र मी अक्षर खोटें वदणार नाहीं या वाणिवाटे ! ६–१३३ श्लोक. नांदें सन्निध मी तुझ्या, जवळुनी कल्पांतिं ना गे निघें; अंगाचे तुकडे करीं, तुडविं त्यां; माझा इथे प्राण घे ! देहा या तुजसाठि आजिवरि म्यां रक्षीयलें सुंदरी ! मोक्षा जाइन मी तुवां वधियल्या, घे प्राण हा सत्वरीं !१३४