पान:इंदिरा.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ पद. राग कामबोध ( ताल सुरफक्ता ). "मनीं इष्ट बहुकाल संकल्प केला"-या चालीवर. पुन्हा एकवार मागतों तूजपाशीं, ऐक रूपशाली मम वचनाशीं. ध्रु० दिव्य हे सुंदरि ! राजपुत्रा वरीं, आपुलासा करीं; योग्य तूतें. १ पुन्हा० सोड ह्या खटपटी, यश न ये शेवटीं, व्यर्थ भलत्या अटी गे! न घालीं. पुन्हा एकवार०. १२८ श्लोक. स्त्रियांपेक्षां वाटे नरगण जरी नीच तुज तो, तुझी मिथ्या आहे सकळ कृति आह्मी समजतों; करूं संग्रामातें, जरि न सुखि ये मत्तनय तो; पित्याला जिंकोनी सकळ तव गर्वास हरितों. १२९ पढ़. जिल्हा झिंजोटी-ताल त्रिवट. (“चंद्रकेतु रविवंशीं"- या चालीवर.) सोडुनि दे कृत्य हें तूं, अघटित ना करिं उगा ! स्वीकारीं त्यास तूं, जो तुज मानी जिवलगा; जोडीं गे राष्ट्र-युग्मा, शोभशि ज्या स्वामिनी; अचळ स्त्रीराज्य नोहे, दुर्बळ गे कामिनी. १३०. आर्या. त्या मारिशील जरि तूं, जाण पुरें निश्चयें तुला सांगें- कांचननगरीचा मी फडशा पाडीन सैन्य आणुनि गे!” १३१